आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    'वृक्षदाई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू' या संस्थेस यंदाचा 'जनसेवा पुरस्कार २०२६' प्रदान

    जनसेवा सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त देहूच्या वृक्षदाई प्रतिष्ठानला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते जनसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणासाठी समर्पित असलेल्या 'वृक्षदाई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू' या संस्थेला यंदाचा 'जनसेवा पुरस्कार २०२६' देऊन गौरविण्यात आले. १ लाख १ हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

    हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहात जनसेवा सहकारी बँकेच्या ५४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.