राज्यातील दोन राखीव वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा; १४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास मान्यता : मुख्यमंत्री
राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत २ नवीन अभयारण्ये आणि पुण्यातील ३ क्षेत्रांसह १४ नवीन संवर्धन राखीव वनक्षेत्रांना मान्यता देण्यात आली.
मुंबई : गडचिरोलीतील कोलामार्का आणि ठाणे-पालघर परिसरातील तानसा विस्तारित वनक्षेत्राला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वन्यजीव मंडळाच्या २६ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
तसेच पुणे (वेल्हे-मुळशी, भोरगिरीगड, लोणावळा), रायगड, नाशिक, पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील १४ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णय मुळे वन्यजीव व वनक्षेत्राचे संरक्षण बळकट होणार आहे.
