आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत दिली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २८ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : राज्यात सध्या असलेल्या संघर्षमय दुष्काळी परिस्थितीमध्ये राज्य शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. राज्य शासनाच्या मदतीतून हा दुष्काळाचा संघर्ष निश्चितच कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या मागण्यांबाबतच्या बैठकीत व्यक्त केला.

    या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार विनोद निकोले उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अडचणीत असलेल्या उपसा सिंचन योजनांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या निर्णयाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी.

    दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यात येईल. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना देण्यात येतील. नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. तसेच पीक विम्यासाठी पूर्वी लागू असलेले ट्रिगर पुन्हा सुरू करण्याबाबत तपासणी करून निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.