आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    बारामतीच्छा जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

    बारामतीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जवाहरभाई मोतीलाल शहा (वाघोलीकर) यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २८ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : बारामतीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, दिगंबर जैन समाजाचे आधारस्तंभ जवाहरभाई मोतीलाल शहा (वाघोलीकर) यांच्या निधनाने बारामतीची सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. बारामतीच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जवाहरभाई वाघोलीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणतात की, जवाहरशेठ वाघोलीकर यांनी आयुष्यभर बारामतीची सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रासाठी समर्पित भावनेने काम केले. बारामती नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे अध्यक्ष तसेच मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून बारामतीच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली.

    जवाहरशेठ वाघोलीकर यांच्या निधनाने जैन समाजाचा आधारस्तंभ हरपल्याचे सांगत, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.