आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे -मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

    राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे तयार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २८ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : राज्यातील खरीप हंगामात ट्रिगर-१ (प्रथम काळ) आणि ट्रिगर-२ (दुसरी काळ) लागू झालेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

    या तालुक्यांमध्ये मृद व जलसंधारणाची विविध कामेही हाती घेण्यात येणार आहेत. अपुरा पाऊस आणि दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. विभागाच्या योजनांतील प्रगतीपथावरील आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासह जलसंधारण संरचनांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे.

    कामांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. या कामांसाठी जलयुक्त शिवार अभियान २.०, प्रधानमंत्री कृषी संचन योजना, पाणलोट विकास घटक २.०, जिल्हा नियोजन निधी, विविध घटक व उपयोजना, खनिज विकास निधी, खासदार व आमदार निधी, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी, रोजगार हमी योजना आणि इतर उपलब्ध निधीचा वापर करण्यात येणार आहे.