आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    लघुउद्योजकांच्या विकासासाठी पुढाकार

    अमेरिकन एक्सप्रेस इंडियाने साडेसात हजारांहून अधिक लघुउद्योजक आणि कारागिरांच्या कौशल्य विकासासाठी सीएसआर निधी उपलब्ध करून दिला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २८ ऑक्टोबर २०२६

    नवी दिल्ली : अमेरिकन एक्सप्रेस इंडियाने भारतातील साडेसात हजारांहून अधिक लघुउद्योजक आणि कारागिरांच्या व्यावसायिक कौशल्य विकासासाठी, डिजिटल क्षमता वाढवण्यासाठी तसेच नव्या बाजारपेठांमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्य केले आहे.

    कंपनीने यापूर्वी ॲक्सेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, ग्रामीण विकास एवं चेतना संस्थान (जीव्हीसीएस) आणि मान देसी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांसोबत भागीदारी केली आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, राजस्थान व महाराष्ट्र येथे या संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत.

    अमेरिकन एक्सप्रेस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय खन्ना यांनी सांगितले की, संस्थांच्या माध्यमातून लघुउद्योजकांना मदत केली जात आहे, ज्यामुळे त्यांना व्यवसायाचा पाया बळकट करणे शक्य होईल.