आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    दिवाळीत खासगी बसकडून निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा; तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

    दिवाळीत खासगी प्रवासी बसमालकांनी शासनाने ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जास्त आकारणी केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे RTO ने दिला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २८ ऑक्टोबर २०२६

    पुणे : दिवाळीच्या कालावधीत खासगी प्रवासी बसमालकांनी शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक भाडे आकारू नये. निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी करणाऱ्या बसमालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा, १९८८ व संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला आहे.

    दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने काही खासगी बसमालकांकडून मनमानी पद्धतीने अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी येतात. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे बसमालक संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रवाशांची आर्थिक पिळवणूक रोखणे आणि रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

    शासनाने २० एप्रिल २०१८ रोजीच्या निर्णयानुसार खासगी बसमालकांना निर्धारित केलेल्या भाड्याच्या मर्यादेतच प्रवासी भाडे आकारणे बंधनकारक आहे. दिवाळीच्या कालावधीत विशेष लक्ष ठेवून कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांनी अधिक भाडे आकारणी किंवा इतर नियमभंग आढळल्यास व्हॉट्सॲप क्रमांक ८२७५३३०२०९ यावर संबंधित तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.