आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    मुंबई-पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी निर्बंध कायम ; १ नोव्हेंबरपासून कायमस्वरूपी नियमावली जारी

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावर मालवाहू व अवजड वाहनांना बंदी कायम राहणार असून १ नोव्हेंबरपासून कायमस्वरूपी नियमावली लागू केली जाईल.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २८ ऑक्टोबर २०२६

    पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकवर मालवाहू वाहनांना बंदी कायम राहणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सुरुवातीचा सहा महिन्यांचा निर्बंध कालावधी संपल्यानंतरही ही बंदी लागू राहील. यासंदर्भात राज्य महामार्ग पोलिसांनी, अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांनी कायमस्वरूपी वाहतूक अधिसूचना जारी केली.

    यामध्ये काही ठराविक वाहनांना या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये खासगी कार, जीप आणि इतर बिगर वाहतूक हलक्या मोटार वाहनांना या मार्गावरून १०० किलोमीटर वेगाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर खासगी बस आणि इतर प्रवासी वाहनांना या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकवर प्रवास करण्याची परवानगी कायम राहणार आहे.

    त्यांनी जुन्या मुंबई-पुणे मार्गाचा वापर करण्यास सांगितले आहे. तसेच ८० किलोमीटर वेगाने प्रवासी बस आणि इतर प्रवासी वाहनांना या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकवर प्रवास करण्याची परवानगी कायम राहणार आहे. भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या प्रकारानंतर बोगद्याची रचना, तांत्रिक बाबी आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता. हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. धोकादायक पदार्थ, ज्वलनशील पदार्थ, स्फोटक पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.