आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुण्यात आणखी पाणीकपात नको; खडकवासला धरणात २५.६६ टीएमसी साठा, विरोधक आक्रमक

    खडकवासला धरण साखळीत २५.६६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असताना पुणे शहरात अतिरिक्त पाणीकपात लादण्याला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २८ ऑक्टोबर २०२६

    पुणे : शहरला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत २५.६६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुणे शहरात सध्या सुरू असलेली १३ टक्के पाणीकपात वाढवण्याची कोणतीही आवश्यकता नाही, अशी भूमिका सज्ञान नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी घेतली आहे. महापालिकेने सुरू केलेल्या दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या नियोजनातून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत शहराची पाण्याची गरज भागू शकते, असा दावा त्यांनी केला.

    सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक होणार आहे. जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर वेलणकर यांनी सध्याची पाणीकपात कायम ठेवून उपलब्ध पाण्याची नियोजन करावे, अशी मागणी केली आहे. शहरात सुरू असलेली पाणीकपात पुरेशी असून त्यामध्ये वाढ करू नये, अशी मागणी विरोधी पक्षाने निलेश निकम यांनी केली आहे.

    नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे गटनेते नितीन गावडे आणि शिवसेनेचे शहर सहसंपर्कप्रमुख गजानन थरकुडे यांनी केला. महापालिका प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याऐवजी दररोजच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत एक तास कपात करून नियमित पाणीपुरवठा करण्याचा पर्यायाचा तांत्रिक अभ्यास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे.