नवीन ओप्पो फाइंड एक्स १० सिरीजसह प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या क्षेत्रात ओप्पो इंडियाने आणखी एक उंची गाठली
ओप्पो इंडियाने आपल्या ओप्पो फाइंड एक्स १० आणि एक्स १० प्रो मॅक्स या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीजचे अनावरण केले.
पुणे : ओप्पो इंडियाने नवीन ओप्पो फाइंड एक्स १० सिरीज सादर केली आहे. या सिरीजमध्ये ओप्पो फाइंड एक्स १० आणि ओप्पो फाइंड एक्स १० प्रो मॅक्स या दोन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. ओप्पोच्या नाविन्यपूर्ण आणि प्रीमियम फाइंड एक्स सिरीजची ही दहावी पिढी आहे. प्रीमियम स्मार्टफोनचा अनुभव आणखी चांगला करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या सिरीजमध्ये प्रत्यक्ष दृश्याप्रमाणे स्पष्ट फोटो काढण्याचे प्रगत तंत्रज्ञान, दमदार कामगिरी, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि आकर्षक डिझाइन यांचा समावेश आहे.
ओप्पो फाइंड एक्स१० सिरीजमध्ये असे कॅमेरा तंत्रज्ञान देण्यात आले आहे, ज्यामुळे फोन वापरणाऱ्याचा अनुभव अधिक सहज आणि सुटसुटीत होणार आहे. ओप्पोने आपल्या प्रीमियम उपकरणांच्या मालिकचा विस्तार करत ओप्पो एन्को एक्स४ आणि ओप्पो पॅड मिनी ही दोन नवीन उत्पादनेही सादर केली आहेत. यामुळे ग्राहकांना फोटो काढणे, नवनवीन गोष्टी तयार करणे आणि त्या इतरांसोबत शेअर करणे हे सर्व सहजपणे करता येणार आहे.
नवीन कलरओएस १७ मध्ये एआय माइंड पायलटसह एजंट मोड देण्यात आला आहे. या सुविधेमुळे फोनमधील फोटो आणि फाइल्सचा वापर करून अनेक टप्प्यांमध्ये पूर्ण होणारी कामे सहज करता येतात. या सिरीजमध्ये ८००० एमएएचपर्यंतची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ओप्पो फाइंड एक्स १० प्रो मॅक्समध्ये २ एनएम मीडियाटेक डायमेन्सिटी ९४०० प्रो प्रोसेसर देण्यात आला आहे.
