आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    कर्मचाऱ्यांना नऊ महिन्यांपासून वेतनच नाही

    नऱ्हे येथील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना गेल्या ९ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने तीव्र असंतोष पसरला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २८ ऑक्टोबर २०२६

    पुणे : नऱ्हे येथील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांना गेल्या नऊ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. परिणामी दिवाळी सणाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे रुग्णालयात कर्मचाऱ्यांसह तीव्र आंदोलन करण्यात आले.

    यावेळी कामगारांच्या वेतनाची अडचण केवळ आर्थिक अडचणीपुरती मर्यादित नसून, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे संघटनेने व्यवस्थापनाला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. नियमित वेतन मिळत नसल्यामुळे घरखर्च, भाडे भरणे, जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे आणि कर्जाची परतफेडून करणे अशक्य झाल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

    सचिव आमदार भाई जगताप यांच्या नावाने पत्र काढून मुख्यमंत्र्यांसह, आरोग्यमंत्री आणि स्थानिक प्रशासकीय संस्था, व्यवस्थापन विभागाकडे पाठवले आहे. आठवड्यात वेतन मिळाले नाही, तर आमरण उपोषण, साखळी उपोषण, घोषणाबाजी आणि मोर्चा अशा मार्गांनी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महासंघाने दिला आहे.