भीमाशंकरच्या जंगलात १० हजार वृक्षांची कत्तल होणार? माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा
भीमाशंकरच्या अभयारण्य परिसरात २३ प्रकल्पांसाठी तब्बल १० हजार वृक्षांची कत्तल होणार असल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

पिंपरी : भीमाशंकरच्या जंगलात केवळ ३४ हजार नव्हे, तर तब्बल १० हजार वृक्षांची कत्तल होणार असल्याचा खळबळजनक दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. तसेच भीमाशंकरप्रमाणे राज्यातील २३ प्रकल्पांसाठी विविध ठिकाणी लाखो वृक्षांची कत्तल होणार असल्याचा दावा कुंभार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे केला आहे. विकासाच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीच्या बदल्यात पर्यायी वृक्षलागवड प्रत्यक्षात कितपत होते, तसेच त्यावर संबंधित यंत्रणांचे नियंत्रण आहे का, असे प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित होत आहेत.
वृक्षलागवडीच्या दाव्यांची पडताळणी होणार का? वृक्षतोडीच्या बदल्यात वृक्षलागवड करण्याची अट घालण्यात आली, त्यांचे संगोपन कसे झाले आणि त्यासाठी देण्यात आलेल्या निधीचा वापर कसा झाला, याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. विजय कुंभार यांनी प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमुळे या संपूर्ण प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेल्या या दाव्यावर संबंधित प्रशासन आणि कंपनीची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकेल.
