आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुण्यातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नको ते काम; पोलिसांनी धाड टाकताच चकरावले, मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

    पुण्यातील बंडगार्डन रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चालणाऱ्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून दोन मॉडेल तरुणींची सुटका केली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २८ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुण्यातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमधून एक अतिशय धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. या हॉटेलमध्ये छापा टाकताच समोरचे दृश्य पाहून अधिकारीही चक्रावले. बंडगार्डन रस्त्यावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या प्रकरणाचा पर्दाफाश केला. यानंतर दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

    बंडगार्डन रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडी-बंडगार्डन रस्त्यावरील एक्साइज कॉलनीजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एजंटामार्फत परराज्यातील तरुणींना आणून वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक सुरक्षा कक्षाच्या पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवला. यावेळी ही माहिती खरी असल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने हॉटेलमध्ये अचानक छापा टाकला. यात तरुणींची सुटका केली आहे.

    हॉटेलमध्ये छापा टाकून परराज्यातील मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी रोहन उर्फ राजकुमार (वय ३२), विवेक उर्फ मयंक कबीर (वय ३४), विक्रम उर्फ पीयुष (वय ३४, तिघे रा. आसाम) आणि त्यांच्या एका साथीदारावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, समर्थ पोलिसांनी गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने कारवाई करत समर्थ परिसरातील रिझवान शेख (वय २४) याला अटक केली.