शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गुणात्मक परिवर्तनासाठी सर्वेक्षणाची मदत होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शासकीय योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि अंमलबजावणीत गुणात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्वेक्षणाची मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबई : मुंबई : शासकीय योजनांची व्याप्ती वाढविणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील परिणामकारकता तपासणे महत्वाचे असल्याने त्यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच त्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत नियुक्त ऑक्सिस माय इंडिया या संस्थेमार्फत विविध विभागांच्या योजनांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी माहिती व तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री डॉ. आशिष शेलार उपस्थित होते.
