महिला कैदी व त्यांच्या मुलांच्या मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी राज्यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक सूचना
महिला कैदी आणि त्यांच्या मुलांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना १० कलमी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नवी दिल्ली : नवी दिल्ली : महिला कैदी आणि त्यांच्या मुलांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना १० कलमी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गृह केंद्रीय मंत्रालय, सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलिसांना आवश्यक ती कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शक सूचनांमध्ये दहा प्रमुख क्षेत्रांतील उपाययोजनांचा समावेश आहे. यामध्ये अटक व कारागृह प्रवेश प्रक्रिया, नोंदणी आणि दस्तऐवजीकरण, आरोग्य व वैद्यकीय सेवा, स्वच्छता आणि निवासव्यवस्था, महिला कैड्यांसोबत राहणाऱ्या मुलांचे संरक्षण, कौटुंबिक संबंध जपणी यांचा समावेश आहे.
तसेच, महिला कैदी आणि त्यांच्या मुलांच्या मानवी हक्कांचे प्रभावी संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कारवाई करावी आणि दोन महिन्यांच्या आत कृती अहवाल सादर करावा, असे आवाहन आयोगाने केले आहे.
