आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे विजयी

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २९ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला आहे. काल सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीनंतर पाच मतदारसंघांपैकी दोन जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघातील निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते.

    अखेर गावडे यांच्या विजयाने या मतदारसंघातील लढतीचा निकाल स्पष्ट झाला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पाठबा असणारे अपक्ष उमेदवार सचिन सानप आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांचे आव्हान होते. या तिरंगी लढतीत गावडे यांनी बाजी मारली.

    दरम्यान, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रतापसिंग पाटील यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या पाच जागांपैकी पुणे शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर या दोन मतदारसंघांचे निकाल जाहीर झाले आहेत.