आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांची ताकद पुन्हा दिसली, प्रचाराला न जाता पडद्यामागून सूत्रे फिरवली, निकाल सर्वांसमोर !

    विधान परिषदेच्या ५ जागांच्या निवडणुकीत प्रत्यक्ष प्रचारात न उतरताही शरद पवारांनी आपल्या रणनीतीने दोन जागांवर महाविकास आघाडीला यश मिळवून दिले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २९ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ताकद आजही तशीच अबाधित आहे. पक्षफुटीनंतरही न डगमगता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवणारे शरद पवार सर्वाधिक जागांवर आपले उमेदवार निवडून आणताना संपूर्ण देशाने पाहिले. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीतही त्यांनी स्वतः प्रचारात न उतरता पडद्यामागून रणनीति आखली.

    विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत प्रचंड चुरस बघायला मिळाली. यामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात जोरदार लढत झाली.

    छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंग पाटील यांनी बाजी मारली. तर नागपूर व अमरावती मतदारसंघातही चुरशीची मतमोजणी सुरू आहे. या निकालावरून पवारांची राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.