आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणेकरांवर वाढीव पाणीकपात लादू नका ! महापौरांचे प्रशासनाला आदेश

    पुणे शहरात १० टक्के पाणीकपात सुरू असताना अतिरिक्त पाणीकपात लादू नये, असे स्पष्ट आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २९ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे : राज्य सरकारच्या आदेशानंतर पुणे शहरात १० टक्के पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये आणखी वाढ करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, असा स्पष्ट आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी महापालिका प्रशासनाला दिला. काल कालवा समितीच्या बैठकीत पुणेकरांवर कोणतीही वाढीव पाणीकपात लादू नये, अशा सूचना महापौरांनी दिल्याने नागरिकांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे.

    राज्यातील विविध भागांत निर्माण झालेली दुष्काळाची स्थिती आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठा याचे नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दहा टक्के पाणीकपात करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेनेदेखील १० टक्के पाणीकपात सुरू केली आहे.

    पाणीकपातीचा निर्णय घेण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणेकरांवर वाढीव पाणीकपात लागू करण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्षनेते निलेश निकम व इतरांनी वाढीव पाणीकपातीला विरोध दर्शवला होता.