व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी युवकांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहून चांगल्या सवयी व शिस्तीचा अंगीकार करावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

नाशिक : नाशिक : युवकांनी व्यसनांपासून दूर राहून चांगल्या सवयी, शिस्त आणि एकाग्रतेच्या बळावर स्वतःचे चारित्र्य घडवावे. स्वतः व्यसनमुक्त राहण्यासोबतच मित्र, सहाध्यायी, कुटुंबीय आणि समाजातील नागरिकांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक आणि एस. जे. ए. नालिटिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महाकवी कालिदास कलामंदिरामध्ये आयोजित 'सशक्त युवा, सशक्त भारत' अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.
यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलीप गावित, संवेश कुशारे, डॉ. जयंत जायभावे आदी उपस्थित होते.
