पाणी वापर संस्थांच्या व्यवस्थापनाकरिता महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान
राज्यातील सिंचन व्यवस्थापन यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व पुरस्कार योजना राबवण्यात येत आहे.
पुणे : पुणे : सिंचन व्यवस्थापन यशस्वी होण्यासाठी पाणी वापर संस्थांचे व्यवस्थापन कार्यक्षम असणे व पाणी वापर संस्थांनी स्वावलंबी राहून सुदृढ होणे आवश्यक आहे. या उद्देशाने दरवर्षी महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा योजना राबविण्यात येते.
राज्याच्या जलनीतीनुसार सिंचन व्यवस्थापनात लाभार्थी शेतकऱ्यांचा सहभाग असण्यासाठी सिंचन प्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. या अभियानांतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या गटांत दिले जातात.
