पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन
पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नोव्हेंबर महिन्यात खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ व लोणावळा येथे पक्क्या अनुज्ञप्तीसाठी दौऱ्यांचे आयोजन केले आहे.
पुणे : पुणे : पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्या दृष्टीने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नोव्हेंबर २०२६ मध्ये खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ व लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
खेड येथे ३ ते ५, मंचर येथे १२, १३ व १६, जुन्नर येथे १७ ते १९, वडगाव मावळ येथे २३, २५ व २६ तर लोणावळा येथे २७ व ३० नोव्हेंबर या कालावधीत हे दौरे होणार आहेत.
