जेएसपीएम विद्यापीठ, पुणे यांच्या द्वितीय दीक्षांत समारंभाचे ३१ ऑक्टोबर रोजी आयोजन
जेएसपीएम विद्यापीठ, पुणे यांच्या द्वितीय दीक्षांत समारंभाचे आयोजन शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी वाघोली येथील श्रेयाश बँक्वेट्स येथे करण्यात आले आहे.

पुणे : पुणे : जेएसपीएम विद्यापीठ, पुणे यांच्या द्वितीय दीक्षांत समारंभाचे आयोजन शनिवारी, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता श्रेयाश बँक्वेट्स, वाघोली, पुणे येथे करण्यात आले आहे. या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील एकूण १,१७३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी (AVSM), कमांडंट, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला हे उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवी जोशी यांनी दीक्षांत समारंभाची माहिती दिली.
