एचडीएफसी बँकेतर्फे प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष अशा फ्लेक्जी इलेक्ट्रिक कार लोनची सुरुवात
एचडीएफसी बँकेने ईव्ही खरेदीदारांसाठी विशेष अशी 'फ्लेक्जी इलेक्ट्रिक कार लोन' योजना सुरू केली आहे.
पुणे : पुणे : एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँकेतर्फे प्रथमच अनोख्या अशा फ्लेक्जी इलेक्ट्रिक कार लोन या नाविन्यपूर्ण ऑटो कार लोनची सुरुवात केली असून ही योजना विशेषपणाने इलेक्ट्रिक व्हेईकल्स (ईव्हीज) च्या खरेदीसाठी अर्थपुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
फ्लेक्जी इलेक्ट्रिक कार लोन या योजने अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या बॉडी आणि बॅटरी साठी वेगवेगळ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये बॅटरी वरील कर्ज हे फेडण्यासाठी ग्राहकांना अधिक कालावधी मिळणार आहे.
भारतात ईव्हीची क्रांती वेगाने गती घेत आहे. २०२३० पर्यंत ३० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे लक्ष्य भारत सरकारने ठेवले आहे.
