कोथरूड वाहतूक विभागांतर्गत चांदणी चौकात कोथरूड कडे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी
चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणाऱ्या एसटी बसेस व खाजगी ट्रॅव्हल्स बसेस यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
पुणे : पुणे : चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणारी एसटी बसेस व खाजगी ट्रॅव्हल्स बसेस यांना बंदी करण्यात आली असून कोथरूड कडे येण्यासाठी चांदणी चौक, डुक्कर खिंड, वारजे जंक्शन, आंबेडकर चौक, वनदेवी चौक व पुणेकर रोड पीडब्लूडी मार्गे स्थळे जावे.
नागरिकांना यासंदर्भात काही सूचना असल्यास ९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
