आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    महात्मा फुले स्मारकासाठी २३० कोटी

    महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा परिसर विकासासाठी २३० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २९ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा परिसराच्या संपूर्ण विकासासाठी २३० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत फुलेवाडा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

    या बैठकीत सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेचे स्मारक उभारणीचे काम येत्या तीन आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.