आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    रावेत मधील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाला नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा तीव्र विरोध; प्रकल्प रद्द करण्याची आयुक्तांकडे मागणी

    रावेत येथील सेक्टर २३ मध्ये प्रस्तावित असलेला 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्प नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याने तो रद्द करावा, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २९ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी : रावेत परिसरातील सेक्टर २३ मधील सर्व्हे क्रमांक १५५, १५६, १५८ आणि १५७ येथे प्रस्तावित असलेल्या 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाला नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भूमिका त्यांनी महापालिका आयुक्तांकडे मांडली आहे.

    प्रस्तावित प्रकल्पाच्या परिसरात संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील देहूरोड ॲम्युनिशन फॅक्टरी असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

    पर्यावरणीय परिणाम आणि कचरा व्यवस्थापनासंबंधी प्रश्न न सोडवता प्रकल्प उभारणीचा निर्णय घेणे योग्य नाही, असे मत तरस यांनी व्यक्त केले.