आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    ऐश्वर्या बाबर यांच्याकडून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाखांची मदत..!

    वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून भाजप महिला मोर्चा पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष ऐश्वर्या बाबर यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी १ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २९ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी : वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून सामाजिक उत्तरदायित्व जपण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष ऐश्वर्या बाबर यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली.

    २० ऑक्टोबर रोजी वाढदिवसानिमित्त त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी आमदार अमित गोरखे उपस्थित होते.