पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये दुचाकींसाठी नवीन NW मालिका; आकर्षक व पसंतीचे क्रमांक आरक्षित करण्यासाठी ३० ऑक्टोबरला अर्ज करण्याचे आवाहन
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांसाठी नवीन NW मालिका सुरू होत असून पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी ३० ऑक्टोबर रोजी अर्ज करावेत.
पुणे : पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे दुचाकी वाहनांसाठी लवकरच NW ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्काच्या तीनपट शुल्क भरून आरक्षित करण्यासाठी इच्छुकांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज करावेत.
चारचाकी वाहनांची यादी २ नोव्हेंबर तर दुचाकी वाहनांची यादी ३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. बोली प्रक्रिया ३ नोव्हेंबर रोजी पार पडेल.
