आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे विनम्र अभियान पदयात्रा

    पिंपरी चिंचवड महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या बोनस, वेतन व इतर मागण्यांसाठी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली विनम्र अभियान पदयात्रा काढण्यात येणार आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २९ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सर्व विभागात काम करत असलेल्या कंत्राटी पद्धतीवर दाखवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या परिवारात दिवाळी साजरी करण्याकरता ३ नोव्हेंबर २०२६ पूर्वी बोनस कायद्यानुसार बोनस व ऑक्टोबर महिन्यातील वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महापालिका भवन अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे.

    राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

    आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी, वाहन चालक, नर्सेस, तांत्रिक कर्मचारी, अग्निशमन कर्मचारी, सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन व इतर सोयी-सुविधा मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.