महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटी या डिजिटल प्रणालींच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई : मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, एकात्मिक डेटाबेस आणि डिजिटल प्रणालींच्या प्रभावी वापरातून शासकीय कामकाजाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यास मदत होणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे 'महाआयडी'च्या माध्यमातून नागरिकांची माहिती एकत्रित करण्याबरोबरच शासकीय यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने बैठक झाली. या प्रसंगी विविध विभागांचे मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी 'आपले सरकार २.०', 'महाडीबीटी' आणि 'मैत्री' पोर्टलवरील नवीन सेवांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
