डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी-सुविधा पुरवण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

मुंबई : मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
शिवाजी पार्क परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या व स्मारकांच्या ठिकाणी स्वच्छता, वैद्यकीय सेवा, पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि निवासाची व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महापरिनिर्वाण दिनाच्या व्यवस्थेसाठी अंदाजे २५ ते ३० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.
