सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला 'गोल्डन बॅनियन अवॉर्ड २०२६'; महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब : मंत्री शंभूराज देसाई
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला 'द वीक हेरिटेज अवॉर्ड - गोल्डन बॅनियन अवॉर्ड २०२६' प्रदान करण्यात आला आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले.

मुंबई : मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) 'आयएनएस गुलदार' या प्रकल्पाला 'द वीक हेरिटेज अवॉर्ड - गोल्डन बॅनियन अवॉर्ड २०२६' प्रदान करण्यात आला आहे.
भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय, कृत्रिम प्रवाल व पाणबुडी पर्यटन प्रकल्प म्हणून विकसित होत असलेल्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली येथे राष्ट्रीय संग्रहालय व ग्रंथालय येथे आयोजित समारंभात केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
