आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान ऑनलाइन जमा मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांची माहिती

    राज्यातील १०,३१२ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे २०२६-२७ या वर्षातील अनुदानाचा पहिला हप्ता ७९ कोटी २१ लाख रुपये ऑनलाइन बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३० ऑक्टोबर २०२६

    मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना २०२६-२७ या आर्थिक वर्षातील सहायक परिरक्षण अनुदानाचा पहिला हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन जमा करण्यात आला आहे. यासाठी ७९ कोटी २१ लाख १४ हजार रुपयांचे देयक मंजूर झाले आहे.

    यापूर्वी ग्रंथालय अनुदानाचे वितरण जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत पारंपरिक पद्धतीने होत असल्याने विलंब होत असे. आता संगणकाधारित 'ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली'मुळे वितरण प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे.