आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे अद्ययावत दालन उभारण्यासाठी शासन पुढाकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३० ऑक्टोबर २०२६

    मुंबई : दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात प्रशांत कुलकर्णी संपादित 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारण्याची घोषणा केली.

    व्यंगचित्रकला ही एक प्रभावी कला असून भाष्य न करताही सामाजिक व राजकीय घडामोडींवर मर्मघातक प्रहार करण्याची ताकद त्यात असते. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री डॉ. आशिष शेलार उपस्थित होते.