शेतकऱ्यांबद्दल बेताल विधान केल्याने एकनाथ शिंदे आमदारावर संतापले; थेट निलंबनाची कारवाई होणार?
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीव्र संतापले असून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

मुंबई : शिवसेना आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अलिकडेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र टीका झाली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
शेतकरी आपला अन्नदाता असून त्याच्याविरोधात कोणतीही विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी कडक ताकीद शिंदे यांनी दिली आहे. यापूर्वीही कँटीनमधील हाणामारी आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे संजय गायकवाड अडचणीत आले होते.
