कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची विनम्र अभियान पदयात्रा यशस्वी; महापौर रवी लांडगे यांचे महानगरपालिकेला कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस व वेतन अदा करण्याचे आदेश!
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या पदयात्रेनंतर पिंपरी-चिंचवड महापौर रवी लांडगे यांनी पालिकेच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व वेतन देण्याचे आदेश दिले.
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ४५०० कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस व वेतनासंदर्भात कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली विनम्र अभियान पदयात्रा काढण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेली ही पदयात्रा महापालिकेत पोहोचली.
महापौर रवी लांडगे यांनी कामगार प्रतिनिधींसोबत सकारात्मक बैठक घेऊन कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस व वेतनाचे परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले. तसेच कंत्राटदारांनी बोनस नाकारल्यास कडक कारवाईचा इशारा दिला.
