सांस्कृतिक वारसा संवर्धनाच्या नव्या पर्वाचा 'बाप्पाचा कट्टा' उपक्रमाचा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते पुणे येथे शुभारंभ
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी 'बाप्पाचा कट्टा' उपक्रमाचे उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले.

पुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा गौरव जपत 'बाप्पाचा कट्टा' हा उपक्रम फर्ग्युसन महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते सुरू करण्यात आला. या वेळी अभिनेते प्रवीण तरडे व संचालक श्रीपाद विश्रामी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत उखाणे, मंगळागौरीचे खेळ, पोवाडे आणि इतर मराठी लोककला प्रकारांच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. तरुण पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडणारा हा एक महत्त्वाचा मंच ठरेल असे शेलार यांनी सांगितले.
