आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    कीर्तनातून संत विचारांचे शुद्धपणे प्रबोधन करावे : डॉ. उल्हासदाडा पवार

    आळंदी येथे आयोजित १०० व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर १७ व्या नांदी संमेलनात डॉ. उल्हासदाडा पवार यांनी कीर्तनातून संत विचारांचे शुद्ध प्रबोधन करण्याचे आवाहन केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३० ऑक्टोबर २०२६

    आळंदी : वारकरी संप्रदाय हा संतांच्या विचारांचा वारसा जपणारा समृद्ध संप्रदाय आहे. आजच्या काळात कीर्तनातून संत विचारांचे शुद्धपणे आणि योग्य पद्धतीने प्रबोधन होणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. उल्हासदाडा पवार यांनी व्यक्त केले.

    आळंदी येथे विश्वशांती केंद्र आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित १७ व्या नांदी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या वेळी डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. श्रीपाल सबनीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.