जयपूर वॉच कंपनीचे पुण्यातील दुसरे दालन सीझन्स मॉलमध्ये सुरू
प्रसिद्ध घड्याळ निर्माते गौरव मेहता यांच्या जयपूर वॉच कंपनीचे पुण्यातील दुसरे दालन हडपसर येथील सीझन्स मॉलमध्ये सुरू झाले आहे.

पुणे : प्रसिद्ध घड्याळ निर्माते गौरव मेहता यांनी स्थापन केलेल्या 'जयपूर वॉच कंपनी'ने पुण्यातील सीझन्स मॉलमध्ये आपले दुसरे दालन सुरू केले आहे. या दालनात वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आणि उच्च दर्जाच्या घड्याळांची मोठी श्रेणी उपलब्ध आहे.
प्राचीन नाण्यांचा वापर करून तयार केलेली घड्याळे या ब्रँडचे मुख्य आकर्षण असून, ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध डिझाइन्स या दालनात सादर करण्यात आल्या आहेत.
