आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पिण्याचे पाणी आणि शेतीच्या नियोजनासाठी समन्वयाने काम करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

    पुणे शहर व ग्रामीण भागातील पाण्याचे नियोजन योग्य रीतीने करून पिण्याचे पाणी व शेतीची गरज भागवण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३० ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार बोलत होत्या. पुणे शहराचा पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील शेतीच्या पाण्याचे नियोजन अत्यंत गांभीर्याने आणि दक्षतेने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

    खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्याचा विचार करून महापालिका आणि जलसंपदा विभागाने पारदर्शक पद्धतीने नियोजनाची अंमलबजावणी करावी. तसेच भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.