आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पी एम पी एम एल च्या सेवकांचे कार्य कौतुकास्पद : संदीप खर्डेकर

    प्रतिकूल परिस्थितीतही पुणेकरांची सेवा करणाऱ्या पीएमपीएमएल बस चालकांना व कर्मचाऱ्यांना क्रीएटिव्ह फाउंडेशनतर्फे स्पीकर सेट भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३० ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी, ऊन-पाऊस अशा कठीण परिस्थितीतही पुणेकरांना अखंड बस सेवा पुरवणाऱ्या पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन क्रीएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केले.

    या वेळी स्वारगेट डेपोतील कर्मचाऱ्यांना संगीत संच (स्पीकर सेट) भेट देण्यात आले. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विकास जाधव, शैलेश जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते.