केंद्रीय भूमी संसाधन विभागाचे सचिव दिलीप कुमार ३० ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील पाणलोट विकास कामांची करणार पाहणी
केंद्रीय भूमी संसाधन विभागाचे सचिव दिलीप कुमार (आयएएस) ३० ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाणलोट विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
पुणे : केंद्र शासनाच्या भूमी संसाधन विभागाचे सचिव दिलीप कुमार (आयएएस) हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, ३० ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील पाणलोट विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात खेड प्रकल्पांतर्गत चार गावांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये १४० पाणलोट प्रकल्पांसाठी १,२५१.११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामांमुळे दुष्काळग्रस्त भागात पाणीसाठा निर्माण होऊन शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे.
