आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणत्या ही भेटवस्तू स्वीकारू नयेत, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी

    पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने नागरिक, कंत्राटदार किंवा संस्थांकडून दिवाळीच्या भेटवस्तू स्वीकारू नयेत, असे कडक परिपत्रक आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३० ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासनात पारदर्शकता राहावी यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महत्त्वाचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिक, ठेकेदार किंवा कोणत्याही संस्थेकडून भेटवस्तू किंवा देणगी स्वीकारू नये.

    नियमांचे उल्लंघन करून भेटवस्तू स्वीकारल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच सुरक्षा विभागानेही अशा भेटवस्तू घेऊन कार्यालयात येणाऱ्यांना मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.