चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळली जीवितहानी
चिंचवड येथील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीतून अग्निशमन दलाच्या जवानांनी १५ नागरिकांची सुखरूप सुटका केली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या.
इमारतीच्या गच्चीवर अडकलेल्या १५ नागरिकांना जवानांनी तत्परतेने सुरक्षित बाहेर काढले. या आगीत १७ दुचाकी आणि २ कार जळून खाक झाल्या, मात्र जीवितहानी टळली.
