आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    दिवाळीनिमित्त ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वस्तू संकलन मोहीम

    दिवाळीच्या स्वच्छतेत निघणाऱ्या चांगल्या सुस्थितीतील वस्तू गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेने ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर रोजी आर.आर.आर. संकलन मोहीम आयोजित केली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३० ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग आणि 'स्वच्छ' संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आर.आर.आर. (रीड्यूस, रियूज, रिसायकल) मोहीम राबवली जाणार आहे.

    दिवाळीत घरात निघणारे सुस्थितीतील जुने कपडे, पुस्तके, खेळणी, भांडी गरजूंपर्यंत पोहोचवून कचरा कमी करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.