गणेशोत्सवाला जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - मंत्री ॲड. आशिष शेलार
महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.
मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या जागतिक यादीत समाविष्ट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
'बाप्पा.ऑर्ग' आणि 'बाप्पाचा कट्टा' या डिजिटल उपक्रमांद्वारे गणेशोत्सवाचा इतिहास, कथा, छायाचित्रे आणि लोककला जगभरात पोहोचवण्याचे काम केले जात आहे. नागरिकांनी यात मोठ्या संख्येने नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले.
