आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    दुष्काली परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार: पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

    दुष्काळजन्य परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळावा यासाठी राज्य शासनाने वाळलेल्या सुक्या चारेची आणि मुरघासाची कमाल पायाभूत किंमत निश्चित केली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३१ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : दुष्काळजन्य परिस्थितीत संभाव्य चारा टंचाईवर मात करून पशुपालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने चारा खरेदीचे दर निश्चित केले आहेत. पशुधनासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या सुक्या चारेची कमाल आधारभूत किंमत वाहतूक खर्च वगळून प्रतिकिलो १२ रुपये, तर मुरघासाची कमाल आधारभूत किंमत वाहतूक खर्च वगळून प्रतिकिलो ८ रुपये निश्चित केली आहे, अशी माहिती पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

    राज्यातील खरीप हंगामातील परिस्थितीचा आढावा घेऊन आतापर्यंत एकूण ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने अभ्यासगटाची स्थापना केली होती. या अभ्यासगटाच्या शिफारशींनुसार चारेचे दर आणि गुणवत्तेचे निकष ठरवण्यात आले आहेत.