सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे अभिवादन केले.

नाशिक : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील राजगड शासकीय विश्रामगृहात त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
