मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आर्यन पंप्सच्या 'ग्लोबल डिझाइन आणि इनोव्हेशन सेंटर'ला भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनापती बापट रस्त्यावरील आर्यन पंप्स अँड एन्व्हायरनमेंट्स प्रा. लि. च्या 'ग्लोबल डिझाइन आणि इनोव्हेशन सेंटर'ला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनापती बापट रस्त्यावरील आर्यन हाऊस येथे कार्यरत असलेल्या आर्यन पंप्स अँड एन्व्हायरनमेंटल सोल्यूशन्स प्रा. लि. च्या ग्लोबल डिझाइन आणि इनोव्हेशन सेंटरला भेट देऊन तेथील संशोधन व तंत्रज्ञानविषयक कामकाजाची माहिती घेतली.
कंपनीमार्फत जागतिक गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन केले जाते. येथे विकसित हायड्रॉलिक पंप, जेटिंग रिसायकलर्स तसेच आपत्कालीन सेवांसाठी आवश्यक वाहनांच्या डिझाइन प्रक्रियेची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि अभियंत्यांचे कौतुक केले.
