अमृत संस्थेमार्फत आयोजित अमृत दुर्गोत्सव २०१६ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी अमृत संस्थेतर्फे 'अमृत दुर्गोत्सव २०१६' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
पुणे : महाराष्ट्राचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा वारसा जपत नव्या पिढीमध्ये शिवविचारांची प्रेरणा जागवण्यासाठी अमृत संस्थेतर्फे 'अमृत दुर्गोत्सव २०१६' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१६ दरम्यान चालणाऱ्या या उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने बनवलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीचा फोटो संकेतस्थळावर अपलोड करावा.
सहभागींना मुख्यमंत्र्यांच्या सहीचे प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असून, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
